लढा
लढा
लढा रोगराईशी
थोडे स्वतःला जपत
थोडे इतरांचे
आरोग्य सांभाळत
लढा अज्ञानाशी
अंधश्रद्धा निर्मूलनाचा
वैज्ञानिक दृष्टिकोन
अवलंबण्याचा
लढा शिवबांचा
स्वराज्यासाठी
लढा आंबेडकरांचा
अन्यायासाठी
लढा ज्योतिबा
अन् सावित्रीबाई फुलेंचा
शिक्षणाचा पाया
रोवण्याचा
लढा स्वतःशीच
अहंकाराला सोडण्याचा
स्वाभिमान मात्र
जपण्याचा
लढा हेवेदाव्याशी
माणुसकी जपण्याचा
माणसातील माणूस
ओळखण्याचा
लढा फसवणुकीशी
प्रामाणिकपणाचा
मार्ग अवलंबून
देश घडवण्याचा
