STORYMIRROR

Chandanlal Bisen

Abstract

3  

Chandanlal Bisen

Abstract

लावण्यवती

लावण्यवती

1 min
198

ती प्रातः सकाळी

उफाळून आली

हृदयात बसली 

हृदयात रुतली ।


कशी काय अचानक

प्रश्न पडे मनाशी

चाहूल न येण्याची

आसही नव्हती मनाची ।


ज्या भाग्यवंता भाळे ती

त्यांच्यात सहज अवतरे ती

ओठ थरथरती, 

शब्द सळसळती

भरभर किमया

घडे लेखणीची ।


लळा लागे त्या प्रियतमेचा

जुळले सुत मी झालो तिचा

तिही मजविना रहावे

गोडवा तिचा किती गावे ?


मजकरीता दारात उभी

जशी शुक्र चांदणी नभी

घेऊनी रस स्वादाचा पेला 

घेताय व्हय? 

सारखी विचारे मला ।


ती शृंगाराची धनी

कंठी गोड सुस्वरे गाणी,

ती काव्यात्मकतेची राणी

लावण्यवती माझी कविता..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract