लाल गुलाब..!
लाल गुलाब..!
मनातले सारे
शब्दात आले
शब्दाचे मोती
गुलाबाचे झाले
भावनांनी त्यांचे
आकार घेतले
शब्दांना त्यांचे
नाव मिळाले
मोर धुंदीत
स्पर्श झाले
वेडे मन
प्रेमात पडले
नकळत सारे
अवचित घडले
लाल गुलाबाने
सारे घडवले...

