*लाल चेंडू*
*लाल चेंडू*
लाल लाल चेंडू
खेळतोय पांडू...
चेंडू गोल जसा
पृथ्वीचा गोल तसा...
चेंडू मारतो उड्या
पांडू काढतो खोड्या....
पांडूने चेंडू उचलला
आकाशी त्याला उडवला...
चेंडू उडाला आकाशी
खेळू लागला नभाशी.....
चेंडू मातीत रंगला
लाल चेंडू मळाला.....
मळका चेंडू घेतला
पांडूने त्याला धुतला....