लाइब्रेरी मध्ये सहज ..
लाइब्रेरी मध्ये सहज ..
लायब्ररी मध्ये मी
समोर पुस्तक घेऊन
अभ्यास करताना
अचानक तुझं समोर येणं
अणि मी एकटक फक्त
तुझ्याकडेच पाहत राहणं...
तुझ्या चेहर्यावरील तेज
ओठांवरची गोड स्माइल
तुझी प्रत्येक अदा
मी माझ्या शब्दात रेखाटणं...
कितीतरी दिवसानंतर
आज मला काहीतरी सुचले
फक्त तुझ्या सौंदर्याला पाहून
अणि शेवटी केलीच मी कविता
मला ना रहावून....
तू कायम अशीच हसत रहावीस
एवढीच प्रार्थना आहे,
अनोळखी आहेस तरीही
तुझा आयुष्य आनंदाने भरून यावं
माझी एवढीच इच्छा आहे.....

