कविता
कविता
प्रेम मनाचे
न सांगताही मला तुझ्या
नजरेची भाषा कळली
अबोल प्रीत मनाची
तुझ्या मनाशी जुळली
मनाचिया गाभाऱ्यात
मूर्ती तुझीच वसते
वेड्या मनात प्रेमा
स्वप्न तुझीच पहाते
सुगंध तुझ्या प्रेमाचा
दरवळला दाही दिशा
तुझ्या सहवासात मनाच्या
फुलवून येतात आशा
बाह्य रूपावर प्रेम नव्हते
सुंदर मनावर प्रेम केले
साथ तुझी असो वा नसो
मनाने मात्र तुझीच झाले

