STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

कविता

कविता

1 min
191

दोन जीवाच्या लग्नाची रेशीमगाठ

स्नेहाची ही वाटचाल जन्मभऱ्याची

एकमेका समजून बहरतोय मळा

संसार वाटीकेत साथ देण्याघेण्याची..


प्रेमळ व्यवहार प्रीत भरवतेय

सप्तपदीची लाज राखावी संसारी

त्याग समर्पण आपल्या प्रीयजनास

हर्षविते या मायेच्या संसार सागरी...


असावे प्रेम करणारे सौभाग्य

एकमेकांप्रती विश्वास वाहणारे

सु:खदु:खात सदैव साथ देणारे

कुटूंबात खेळीमेळीत रूजणारे


सौभाग्याचे अती बहूमुल्य लेणे

पती असतो सौभाग्यलंकार

राखावा संसारात विवेक

करावा हसून खेळून संसार....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational