STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

कविता

कविता

1 min
395

समाजजीवन रीती पंरपरा

अनेक आघात करत असतात

कधी कधी विस्कळीत होवून

सार आयुष्य असतं संकटात.......


प्रथा रूढींची तर बातच न्यारी

शान,बान,आन असे अबाधीत

कर्जात बुडाले तरी चालेल

पंरतू बडेजाव चालतो समाजात...


पुरुष प्रधान देशातील अंहकार

पेलता होई स्त्रीजात भुईसपाट

जन्मच घेतलाय पृथ्वीवरती जणू

उचलती परस्वाधीनतेचा आधारवट......


समाजाचे मुल्य सांभाळून

आदर्श जीवन कसे जगायचे

ऋण असतेच ना समाजाचे

खरडून मुरडून चुकवायचे....... 


सुख दुःखात समाजच येतो  

अडीअडचणीत मदत करावे

सोसुनी हेवे,दावे,द्वेष सारे

जीवन आनंदाने समृद्ध करावे.......


समाज नाही तर सुंदरता नाही

फरक काय ते अळवणी जीणे

अवती भोवती असतात सर्व

म्हणुन आयुष्याचे जीवन गाणे....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational