STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

कविता

कविता

1 min
335

महात्मा गांधी जयंती

सहर्ष करुया साजरा,

हिंदच्या कोहिनूरी हिऱ्यांची

श्रेष्ठ प्रणाली सत्य शांतीचा झरा.....


देशप्रितीची उजळून ज्योती

स्वातत्र्यांची अमुल्य महती,

दाखवला जगा शांतीचा

मार्ग हा क्रांतीचा खरा......


जनामनात दिसला ईश्वर

झिजले हो ती कण-कण,

म्हणुन ठरले ते महात्मा

गौरव हो त्यांचा करा .........


घेवूनी देशमुक्तीचा ध्यास

वैभव सारे सोडून आले,

स्वातंत्र्याच्या लढा दिला

सर्व हो त्यांना स्मरा .........


राजकारण जरी करीती

जनात रमले जन होवूनी

भारतास सांभाळुनी झाले

देशासाठी केली उपोषनी......


भारतभूमी स्वतंत्र होता

सर्वमान्य हे झाले जनतारा

पंचवार्षिक दिल्या योजना

नव निर्माणाचा वाहतो वारा.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational