कविता म्हणजे
कविता म्हणजे
कविता म्हणजे अक्षरांची सुंदर रांगोळी
उभ्या दहा आडव्या दहा ठिपक्यांची,
कविता म्हणजे शब्दांची हिरवळ
मनाला मोहिनी घालणारी,
प्रभाती पाखरांची किलबिल,
सांज वेळी एक आल्हाद झुळूक,
रातराणीचा मोहक गंध,
श्रावण सरींचा मंद शिडकावा,
प्रियतमेच्या विरहातलं रडगाणं...
माफ करा,
तुमच्या लेखी जर
कवितेची हीच व्याख्या असेल
तर कवी म्हणून घेण्यात
अजिबात रस नाही.
