कवाडे
कवाडे
मनाची कवाडे / उघडा सत्वरे
ध्यान द्यावे त्वरे / ईशाप्रती
बुद्धीची कवाडे /प्रवाह ज्ञानाचे
पुण्य ज्ञानदाने / मिळवावे
चक्षुंची कवाडे / जग बघण्यासी
अवलोकण्यासी / ब्रम्हांडासी
कानाची कवाडे / श्रुती सुखासाठी
नादब्रम्हासाठी / भुकेलेले
हाताची कवाडे / आतुर कर्मासी
दानधर्म देसी / गरीबांसी
अध्यात्म कवाडे /भक्तीमार्गाप्रती /
परब्रम्हाप्रती/ मार्ग जाती
विविध कवाडे / लाभली मानवा
लाभ नित्य घ्यावा / नरजन्मी
