STORYMIRROR

Shekhar Chorghe

Romance Abstract Others

3  

Shekhar Chorghe

Romance Abstract Others

कुठे गेला तो चंद्र

कुठे गेला तो चंद्र

1 min
14.3K


रात्रीच्यावेळी त्या चांदण्या 

गुणगुणत होत्या 

एक छानसं अंगाईगीत 

'चंद्राला निजवण्यासाठी' 

इकडे तिकडे झेपावणार्या 

ढगांना सांगत आहेत 

गप्प बसा, झोपा अगदी शांतपणे 

तो बघा चंद्र विसावलाय 

किती शांतपणे 

आईच्या कुशीत निजल्यासारखा 

तुम्हीही निजा थोडावेळ 

जर तो चंद्र जागा झाला 

तर तो मलाही उठवेल 

नि आम्ही दोघेही जागू 

रात्रभर 

खूप सार्या आठवणींत 

आमची मैफिलच जमेल

जशी कवींची जमते अगदी तशी 

मग खूप सारे 

आठवांचे पक्षी येतील 

दोघांच्याही घरट्यात 

विसावण्यासाठी 

जे लपले होते किती तरी काळ 

खोल अंतरात 

कित्येक कडू गोड आठवणींना 

पंख फुटतील 

कवितांना शब्द सुचतील 

ज्या आठवणी 

खोल काळजात दडल्या आहेत 

त्यांना उजाळा मिळेल 

मलाही त्या सार्या सांगाव्या लागतील 

अगदी नको असलेल्या सुद्धा 

त्या आठवणींचा उमाळा 

डोळ्यांतून बाहेर येईल 

अगदी अलगद 

नि भिजेल सारी रात्र 

त्या शब्दांनी 

झोप उडेल, डोळे जागतील 

अन् मग 

दोघांनाही झोप येणार नाही 

अगदी कायमची 

मग तुम्ही विचाराल 

कुठे गेला तो चंद्र 

'आमच्या मिठीत विसावणारा'?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance