STORYMIRROR

Veena Chavan

Abstract Others

3  

Veena Chavan

Abstract Others

कुंडीतली रोपटी

कुंडीतली रोपटी

1 min
149

कधीतरी येणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकीबरोबर पानांना हलवत राहतात

अपुऱ्या सूर्यप्रकाशात देखील

पुरेसं हरितद्रव्य बनवत,

स्वतःला जगवत राहतात,

तहानलेली मुळं 

घटाघट पाणी रिचवत जातात

तसें अनेक बुडबडे वर येत

मुळांत चटचट पाणी शोषलं जातं 

कुंडीतल्या रोपट्यांना सोयच नसते

स्वयंप्रेरणेने धरणीत खोल जात

पाण्याचा शोध घेण्याची

कित्येक रोपट्यांना तर

ओळखही नसते सकाळच्या कोवळ्या

सोनसळी किरणांची,

वाढत असतात

खुरडत खुरपत

काँक्रिटच्या छताखाली,

तप्त सूर्यप्रकाशात

मुळांना घट्ट जमिनीत रोवत,

वादळांना तोंड देण्याची

आदीम प्रेरणा

जणु उपजतच नष्ट होत जाते त्यांची,

ही कुंडीतली रोपटी 

पिंजऱ्यात असलेल्या

पोपटासारखी वाटतात मला

त्यांनी हिरवं राहावं

त्यांनी सुंदर फुलं द्यावीत

त्यांनी सुशोभीत करावं बाल्कनीला,

म्हणून उसनी पोषणद्रव्ये देत वाढवलेली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract