STORYMIRROR

Veena Chavan

Others

3  

Veena Chavan

Others

तिचं बालपण समोर दिसू लागलं

तिचं बालपण समोर दिसू लागलं

1 min
10

हिरव्या चैतन्याच्या झाडाचं 

आता जुनं खोड झालं 

हिरव्या सळसळत्या पानाचं 

आता पिकलं पान झालं 

खडबडीत झालं खोड 

शिरा सगळ्या वरती आल्या 

लटपटत्या पायांनी

डळमळीत पावलं पडू लागली 

कधीही जाईल तोल 

आणि तुटतील झाडाच्या फांदया त टा त ट 

म्हणून जीवाला घोर लागला 

शी सू चं नियंत्रण गेलं,

आतून कडी लावू नकोस 

म्हणून सारखं सारखं बजावणं आलं 

खालीवर लावलेली बटणं 

पुन्हा पुन्हा सोडवणं आलं,

हळूहळू घास चावताना 

काही मिनिटांचं जेवण तासावर आलं 

कधी केले नसतील हट्ट लहानपणी ,

मोठेपणीही स्वतःच्या मनाचा कधी नव्हता केला विचार 

पण आता मात्र तिच्याच मनाने वागण्याचा असतो तिचा निर्धार 

जिनं केलं आमचं बालपण मोठं 

तिचंच मूर्तीमंत बालपण आता

समोर दिसू लागलं


Rate this content
Log in