उन्माद
उन्माद
उन्माद कधीच काठोकाठ भरून
ओसंडून वाहूही लागलाय
धूसर आणि पुसट होती
उत्साह आणि उन्मादातली रेषा,
ती कधीच पुसून
तो धिंगाणा घालू लागलाय बेताल होऊन
रस्त्यारस्त्यांवरून, चौकाचौकांतून,
आणि गल्लीगल्लीतून
सगळेच सण काबीज केले राजकीय आखाड्यांनी
धुळीस मिळवली सणांची शुचीर्भुतता आणि पवित्रतता
आता प्रत्येक सण शड्डू ठोकून कुस्तीच्या मैदानात, साजरा होतोय,
लाखालाखांची बोली लावत
उच्च रवाने कानठळ्या बसवत,
अश्लील गाण्यावर मद्यधुंद
होऊन अश्लील अंगविक्षेप करत
कुठल्या राजकीय अखत्यारीत तो कसा साजरा होतोय ह्यावर ठरतं असतं प्रत्येक राजकीय गणित,
कळलं नाही सामान्यजनांना
कधीच विकले गेले
सगळेच सण दहीहंडीपासून, गणपती आणि नवरात्री, होळी पर्यन्त,
आता
शिमगा करत फिरत असते
तरुणांई राजकारण्यांमागे,
उन्मादाला जहाल होईस्तो अंगात भिनवत,
आणि विचारशक्तीला तिलांजली देत .
