STORYMIRROR

Veena Chavan

Others

3  

Veena Chavan

Others

अलिप्तता

अलिप्तता

1 min
11

फुटपाथवर पाय पोटाशी घेऊन 

ती झोपली होती 

गाढ, निर्धास्त 

अर्धी उघडी 

तोही तिच्या समोर निद्रिस्त 

अर्ध्या कपड्यात उघडाच 

तांडे होते ते मजुरांचे 

घोळक्या घोळक्याने फुटपाथवर बसलेले 

तीन दगडाच्या चुलीवर काहीतरी रटरटणारं,

तर एखादी भाकरी बडवीत 

तोंडाने काहीतरी बडबडणारी 

मुलं उघडीच तिच्या भोवती 

कडे करून,

काही आपल्याच तालात 

खेळात मग्न असणारी 

तिथे खिन्नता नव्हती,

तिथे अस्वस्थता नव्हती ,

होती फक्त अलिप्तता 

बाकी जगापासून त्यांना वेगळी करणारी 

शरीराची भूक,

पोटाची भूक,

भावनांची भूक,

सारं अगदी फुटपाथवर निभावत 

अलिप्त झालेली,

हे तांडे भारतीयचं असतील ना?

अन्न, वस्त्र, निवारा 

ह्या त्यांच्याही मूलभूत गरजा असतील,

पण गगनचुंबी इमारतीखाली 

त्यांच्या डोळयांत कोणतीही स्वप्ने नव्हती 

होती ती फक्त अलिप्तता 

जगापासून तुटलेली


Rate this content
Log in