STORYMIRROR

Veena Chavan

Others

3  

Veena Chavan

Others

का हलक्यात घेतलं जातं मरणाला?

का हलक्यात घेतलं जातं मरणाला?

1 min
7

का हलक्यात घेतलं जातं सामान्यांच्या मरणाला?

कुठून कुठे पत्रा पडेल

कुठून कधी होर्डिंग पडेल

खड्ड्यात स्कूटर अडकून चालवणारा 

कधी कुठे पडुन मरेल

आणि पावसाळ्यात कोसळणाऱ्या 

इमारतीखाली गाडून किती हकनाक मरतील

कधीच काही सांगता येणार नाही

का ह्यांनी हलक्यात घायचं असं 

सामान्यांच्या मरणाला?

प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष

आणि सत्ताकारण हे एकच ध्येय

असलेल्या या 'अर्थ'कारणात 

पावलांगणिक 

मृत्यूची कारणं वाढत ठेवली जातात 

आणि 

मरणाऱ्या जीवाला कवडीमोल ठरवत 

का हलक्यात घेतात हे 

असं सामान्यांच्या मृत्यूला ?

'मोठया दिलाने 'तुटपुंजी मदत

जाहीर करतात 

नेत्यांच्या छबीसह अनेकांचे फोटो झळकतात 

' कसं वाटतंय 'म्हणून

मृतांच्या नातेवाईकांना

माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत 

घटनेचा थरार पुन्हा पुन्हा दाखवत राहतात 

कुटुंबातलं माणूस कायमचं

निघुन जातं तेव्हा होणाऱ्या 

अपरिमित हानीला 

का असं हलक्यात घेतलं जातंय?


Rate this content
Log in