STORYMIRROR

Veena Chavan

Others

4  

Veena Chavan

Others

पानें पानें तृप्त झाली

पानें पानें तृप्त झाली

1 min
11

गच्च दाटून आलेलं आभाळ 

अंधारून आलेला भवताल 

आणि पावसाची अखंड 

बरसणारी धार 

एका तालात वाजणारे पर्जन्यथेंब 

थेट जमिनीला भिडणारे 

थेंबाथेंबानी ओतप्रोत 

ओथबंलेली पानें 

माना वाकवून वाकवून 

भुईकडे पाहत 

शांत, स्तब्ध, निश्चल 

त्यांच्या बरोबर गाणारा वारा 

आज कुठेतरी वळचणीला 

लपलाय ,

पानं मात्र आकंठ पाणी पिऊन 

जड झालेली  

वर्षभराची प्रतीक्षा करून 

आता तृप्त, सचैल न्हालेली 

पावसात असं झाडांना निरखताना  

खुप भरून येतं मला 

नाहीतर ग्रीष्मात 

स्वतः ला जिवंत ठेवण्यासाठी 

पानांना आक्रसून घेत,

आणि पाण्यासाठी 

मुळांना खोल खोल 

धरणीत पाठवीत 

वर्षाऋतुची वाट पाहत 

तगत असतात बिचारी


Rate this content
Log in