STORYMIRROR

Veena Chavan

Others

4  

Veena Chavan

Others

निवडणुकीचं तिकीट

निवडणुकीचं तिकीट

1 min
236

निवडणुकीचं तिकीट 


हल्ली तिघेही त्यांच्या कार्यकर्त्यां बरोबर 

खलबते करीत बसत होते

अगदी रात्री रात्री ,

पक्षातच राहुन तिकीट मिळेल 

ह्याची उरली नव्हती खात्री,

आणि आशावाद फार काळ टिकून ठेवण्याची त्यांची मुळीच नव्हती तयारी 

तिघेही मग करत होते चाचपणी काय करता येईल त्याची,

वडील म्हणाले मुलाला 

बघ तू जा एखाद्या पक्षात 

जिथे असेल खात्री तिकीट मिळण्याची,

मी बरळेन काहीही 

गरळ तुझ्या पक्षाविरुद्ध ,

कदाचित अपशब्द तुझ्या बद्दलही,

पण वाईट वाटून घायचं नाही 

ती असेल निवडणुकीची रणनीती 

उमेदवार म्हणून तिकीट मिळवण्याची,

बायको म्हणाली मी ही 

बघते एखादा पक्ष 

जिथे मिळेल कदाचित मला तिकीट 

तुम्ही काहीही बोला पक्षांविरुद्ध 

मी मुळीच देणार नाही लक्ष,

तिघांनीही ठरवला आराखडा 

कुठल्या पक्षात प्रवेश करायचा,

आधीच्या पक्षाच्या पक्षनिष्ठा 

एकाच दिवसात दुसऱ्या पक्षाला अर्पण करायच्या 

सरड्यालाही मागे टाकत 

झपाझप रंग बदलत होते इच्छुक उमेदवार,

निवडणुकीचं तिकिट मिळवण्यासाठी होत होते लाचार,

उपभोगता येईल अशा सत्तेसाठी 

सोडत होते सगळे शिष्टाचार 

आणि 

जहाल अशा ज्वालाग्राही भाषणात 

रोज करत होते नव्या शब्दांचा अविष्कार.


Rate this content
Log in