STORYMIRROR

Dipali patil

Tragedy Others

4  

Dipali patil

Tragedy Others

कटू स्मुर्ती

कटू स्मुर्ती

1 min
326

भय वाटते आठवांचे

बहु कटू अंतरातलें

दुःखी अनंत विश्वसातलें

स्मरतात सय आयुष्यातलें


ओंजळीतून वाहते जल

तसे विलीन होतात क्षण

क्वचित सुखाचे बहु दुःखाचे

कर्माने कमवीलेले आपण


बांधील ना राहतात कदापि

कोणत्याही नियम अटीत

प्रवहात जातात अथक

आजवर साचलेलें मनात


एकांत क्षीणवतो मजला

आजवरच्या कष्टी स्मृतींनी

कसे विसरू भूतकाळाला

वाहतो ओलावल्या लोचनानी


माय माझी साधी भोळी

सरळ संगोपनात गुंतलेली

मानसिक बळ हरपलेली

तरी अखंडित कार्यरत असलेली


समज येण्याअगोदरच

जाहले मी रजस्वामुळे तरून

डोंगर कोसळला मजवर

वाटत होते जावे मरून


कशा साहू मी यातना

पिडा त्या चार दिवसाच्या

कशी लपवू लाल ठिपक्यांना

नाही दिल्या आईने किमान घड्या वस्त्राच्या


झूण्ज चाले तन मनाची

जोड त्याला भीतीची

कमाल माझी भारी

प्रवाह नियंत्रण करण्याची


अशा नी कितेक स्मरणात

मन भरलेय जड आठवानी

येवो पुन्हा व्यक्त करण्याची

माझ्या साऱ्या कवितांतूनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy