STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract

4  

Sharad Kawathekar

Abstract

कथा

कथा

1 min
489

आयुष्य उध्वस्त होत गेलंय

एखाद्या चरितार्थाच्या प्रश्नांसारखं

जुळवत आणलेले धागे

तुटततुटत गेले कारण नसताना 


कुठल्याच गोष्टीचे लगाम हाती नव्हते 

even स्वतःचेसुद्धा 

कधीमधी येणारे प्रामाणिक 

आक्रोशही आता गोठून गेलेत


या नकली विस्मरणाच्या गर्तेत

सुपाएवढं मन करून 

जगण्याचे सारे प्रयोगही

आता हास्यास्पद झालेत


पावलं पिंजून काढणाऱ्या

रस्त्याची जवळीक वाढत चाललीय

सर्व क्षणांचे चेहरे

कित्येक आठवणी 

देहांच्या हाका आणि 

मनांचे तलम पापुद्रे सांधताना

उगीचच बदनाम झाल्या 

चार डोळ्यांच्या त्या कथा


सांगूनही खरी वाटणार नाही आणि 

आज ओळखही नाकारेल आरसाही

आणि प्राक्तन .......

हे तर आपल्या हातातच नाही 

मग त्याचा विचार का ???

आणि कशासाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract