कथा मोबाईलची
कथा मोबाईलची
सांगते मी मोबाईलची कथा
करुणामय मनाची ह्या व्यथा
मोबाईलविना मला राहवेना
घासही गळ्याखाली उतरेना
संपताच चार्जींग मोबाईलची
काहीली होते माझ्या जीवाची
तहान-भुक जाणवतच नाही
एकटेपणा तरीही संपत नाही
जवळची माणसे लांबच गेली
खंतही याची वाटेनाशी झाली
शुभेच्छांनी गॅलरीही फुल झाली
आपुलकी मात्र आटतच चालली
खराब होता डीस्प्ले मोबाईलचा
विटच आला तेव्हा एकटेपणाचा
आभासी ही दुनीया भावते खुप
हरवत्या संवादाचे वाटेना अप्रुप
एका उपकरणानेच कब्जा घेतला
मोबाईलविना अर्थ नसे जीवनाला
वाटायला लागलंय चुकतंय कुठेतरी
मोबाईलआधीची दुनिया होती प्यारी
आता करत आहे संकल्प नववर्षाचा
वापर करायचा मर्यादित मोबाईलचा
