कसं विसरु तुला आई..
कसं विसरु तुला आई..
रोज आठवण तुझी येई
दुःख झाले मला लई,
झोप लागत मुळीच नाही
कसं विसरु तुला मी आई?
कंठ दाटून हा येई
मुर्ती साक्षात उभी राही,
अन्नपाणी जात नाही
कसं विसरु तुला मी आई?
टाहो फोडतो तुझा आई
शोधू कुठे कळत नाही,
मला हवी माझी आई
कसं विसरु तुला मी आई?
कोण्या विचारु मी लोका
किती मारु तुला हाका?
तुला ऐकू का येत नाही
कसं विसरु तुला मी आई?
आम्हा सोडून का गेलीस
आमी जगावं तरी कसं?
आई.. माझी आई..
कसं विसरु तुला मी आई.?

