करवीरपूरची महालक्ष्मी
करवीरपूरची महालक्ष्मी
करवीरपूरची महालक्ष्मी
कोल्हापुरी तुझा निवास
साडेतीन शक्तिपिठी प्राप्त
अग्रस्थान, नित्य तुझा वास
धन धान्याची देवता मानती
त्रिभुवनी मिळे मान जगदंबे
दुःख दारीद्र दूर महालक्ष्मी
करवीरपूरची महालक्ष्मी
कोल्हापुरी तुझा निवास
साडेतीन शक्तिपिठी प्राप्त
अग्रस्थान, नित्य तुझा वास
धन धान्याची देवता मानती
त्रिभुवनी मिळे मान जगदंबे
दुःख दारीद्र दूर करी माता
तू धाव पाव भक्ता अविलंबे
लाल वस्त्र लेवूनी विष्णुकांता
शंक चक्र गदा करी धारण
श्रीपिठे सूर असुर तव पूजीते
महिमा सर्वलोकी असाधारण
गरुड आसनी झाली आसनस्थ
वैष्णवी ब्राम्ही महालक्ष्मी रूप
करपुरी काळ्या दगडाचे मंदिर
सूर्यकिरण स्पर्शीती पद्म स्वरूप
सुवर्ण रत्नांचे शिरी शोभे मुकुट
कुंकुम मळवटी, ललाटी तिलक
काय वर्णू महिमा तुझा परमेष्टी
भक्तीने तुझ्या बनू पतित पावक
