STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational

3  

Supriya Devkar

Inspirational

करवीर निवासिनी

करवीर निवासिनी

1 min
254

करवीर निवासिनी सोज्वळ तुझे रूप 

पाहता पडे प्रेमात चढे अंगी हुरूप 

कंठी, पेंड, बोरमाळ लेवूनीया साजरी 

गधा धारण करून दैत्यांचा नाश तू करी

कवड्यांची माळ गळा नजर स्थिर लोचनी 

नयनातून अग्नी बरसे तूच असे सत्यवचनी 

म्हाळूंग हाती घेत करशी समृद्धीचा जागर

तुझ्या दर्शनाने आई आनंदला जनसागर

सर्वांचे मंगल तू करशी अखंड माते 

चरणी तुझ्या माथा देवी तुझेच गीत गाते 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational