STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract Tragedy Action

3  

Kanchan Thorat

Abstract Tragedy Action

करून बघ...

करून बघ...

1 min
266

घायाळ हरणीची शिकार,

तर कोणीही करील

 बरं झालं असतं जर;

 कोणी इलाज केला असता .

आता तर सेप्टीक झालंय,

ती लागलेय बदलायला....अंतर्बाह्य!

वाघीणीचं रूप आलंय तिला;

तिची नखं तीक्ष्ण, धारदार झालीयत...!

जबडा रुंदावलाय तिचा,

अन त्यातून बाहेर दिसताहेत,

तिचे धारदार, टोकेरी सुळे,

डोळ्यांमध्ये सामावलेत निखारे...!

 सर्वांगाने, अने सर्वांथांने 

बदललेय ती...!

घायाळ हरणीची शिकार;

तर कोणीही करील!

असेल हिम्मत तर;

वाघिणीची शिकार करून बघ!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract