STORYMIRROR

Sarika Sarkale

Inspirational

3  

Sarika Sarkale

Inspirational

करू या पर्यावरणाचे रक्षण

करू या पर्यावरणाचे रक्षण

1 min
199

पर्यावरणाचा विकास 

हाच आमचा ध्यास 

करूनी त्याचे रक्षण 

थांबवू या त्याचा ऱ्हास 

नद्या नाले देती 

संजीवन खरे 

स्वच्छ ठेवू सारे 

वाहतील आनंदाचे झरे 

झाडे लावूया 

झाडे जगवूया 

मोकळा तो श्वास 

आपण घेऊया 

वसुंधरेची हाक 

येई कानी 

वृक्षसंवर्धन करा 

सुख येईल जीवनी 

पर्यावरण सारे 

स्वच्छ ठेवू 

निसर्गाचा ठेवा 

 सगळेजण जपू 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational