STORYMIRROR

Sarika Sarkale

Others

3  

Sarika Sarkale

Others

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
161

भिजली सारी धरणी

या मृदगंध पावसाने 

चराचर ही फुलले सारे 

झाले मन प्रफुल्लित आनंदाने ....१

या मृदगंध पावसाने

सारी सृष्टी भिजली

कोमेजलेल्या तरूनांही 

नव्याने पालवी फुटली....२

पावसाच्या पडती जलधारा

दिसे निसर्ग हिरवा सारा 

मातीच्या मोहक सुगंधाने

मंत्रमुग्ध आसमंत सारा....३

पडता पावसाचे थेंब

मातीचा सुटे मृदगंध

मनास मोहवी सारा 

हा अलौकिक सुगंध.....४

पावसाच्या येण्याने 

पसरले इंद्रधनु सप्तरंगी 

आनंदाने बागडते

हे फुलपाखरू बहुरंगी.....५

पावसाची लागता चाहूल

सुटतो वादळ वारा

आनंदाने मोर नाचतो

फुलवूनी रंगीत पिसारा.....६


साहित्याला गुण द्या
लॉग इन