STORYMIRROR

Sarika Sarkale

Inspirational

3  

Sarika Sarkale

Inspirational

आठवणींचा हिंदोळा

आठवणींचा हिंदोळा

1 min
220

किती आठवणी

असतात मनात

पटकन निघून

जातात दिवस क्षणात..१


उंच झुले माझा झुला

आठवणींच्या हिंदोळ्यावर

मागे वळून पाहताना

मन येते भानावर...२


किती सुखद असतात

या गोड आठवणी

काहूर माजते आज

लक्षात येताच मनी...३


राहतात फक्त अनुभव

दिवस निघून जातात

आठवणींच्या भोवऱ्यात

स्वःताला गुंतून घेतात...४


आठवणींचा हा हिंदोळा

जाता उंच वरी 

हातात येता पाहतो

काहीच उरत नाही करी...५


आजचा क्षण आपला

उद्याचा भरोसा नाही

मनसोक्त लुटा आनंद

विसरून जा सर्वकाही...६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational