STORYMIRROR

Sarika Sarkale

Others

3  

Sarika Sarkale

Others

हिरवीगार सृष्टी

हिरवीगार सृष्टी

1 min
242

पावसाच्या येण्याने

हिरवीगार होते सृष्टी

पाहता चहुकडे

समाधान पावते दृष्टी...१


निसर्गाचा असे हा 

नयनरम्य देखावा 

पाहून वाटे सर्वांना

या सृष्टीचा हेवा ...२


पावसाचे अलगद थेंब 

पडती तृणावरती 

दवबिंदू हे भासती

फुलते जणू धरती...३


पावसाळा ऋतूत 

रिमझिम धारा बरसती 

अंगावर पडतात सारी 

पाने फुले ही बहरती...४


पावसाच्या येण्याने

शेतकरी सुखावतो

हिरवीगार शिवार पाहून 

वरूणाचे आभार मानतो...५


पानाफुलांनी बहरते 

बळीराजाचे शिवार

पिक येई जोमाने 

देती छाया थंडगार....६


पाऊस पडता फार 

नदी नाल्यांना येई पूर 

आनंदाने मग पक्षीही 

आळवती मधूर सूर...७


साहित्याला गुण द्या
लॉग इन