STORYMIRROR

Sarika Sarkale

Others

3  

Sarika Sarkale

Others

कुटुंबांचा आधार

कुटुंबांचा आधार

1 min
149

बाप असतो सगळ्या

कुटुंबाचा आधार 

त्याच्याविन जगणे 

होते निराधार 

एक आठवण पित्याची

जो राबतो दिनरात

सदैव असतो मस्तकी

आशिर्वादाचा हात 

ज्यांच्या खांद्यावर असतो 

जबाबदाऱ्यांचा व्याप 

कोणतेही तक्रार न करता

हसत मुखाने स्वागत करतो बाप 

प्रत्येक संकटाच्या वेळी 

मार्गदर्शक असतो बाप 

मन भरून येते जेव्हा 

शाबासकीची मिळते थाप 

पित्याचे ऋण असते अपार 

या जन्मात नाही फिटणार 

कष्ट करून आज आपण 

स्वप्न करू त्यांचे साकार 

बाप असतो कर्ता 

आपला जन्मदाता 

पितृदिनानिमित्त मी 

चरणी ठेवते माथा 

असे एकच प्रार्थना 

सोबत राहो अखंड

बाबा तुम्हाला लाभो 

आयुष्य उदंड..


Rate this content
Log in