गुणगान गणेशाचे
गुणगान गणेशाचे
माझा गणराया
दिसतो छान
आहे त्यास
पूजेचा पहिला मान..१
आहे बुध्दी दाता
माझा गणराया
मनोभावे प्रार्थना करून
पडते मी पाया..२
माझा गणराया
आहे मानाचा
येता घरी असतो
प्रत्येक क्षण आनंदाचा..३
माझ्या गणरायाचे
मूषक असे वाहन
असला जरी लहान
संकटसमयी ठरतो महान..४
माझा गणराया
लाडका सर्वांचा
पाहता रुप मनोहर
आनंद मिळे स्वर्गाचा..५
गणरायाच्या आगमनाने
येते आनंदाला भरती
कळत नाही काही
दहा दिवस कशी सरती..६
माझा गणराया घेऊन
येतो मंगलमय वातावरण
करतो भक्तांच्या सर्व
संकटांचे गणराया हरण..७
माझा गणराया
दिसतो खूप भारी
त्याच्या स्वागतासाठी
करूया जोरदार तयारी...८
माझा गणराया देतो
साऱ्यांना शुभ आशिर्वाद
दहा दिवस घुमतो
सर्वत्र ढोल ताशांचा नाद..९
माझा गणराया
संकटात तारणारा
लहान मुलांना
सत्वर पावणारा...१०
माझ्या गणरायाचे
किती कौतुक गावे
आळविते बाप्पा तुजला
आता दर्शन देण्यासाठी यावे..११
शिवपार्वती नंदन
माझा गणराया
दिनरात जयघोष करती
गणपती बाप्पा मोरया...१२
