STORYMIRROR

Sarika Sarkale

Others

3  

Sarika Sarkale

Others

तिरंगा आमची शान

तिरंगा आमची शान

1 min
425

तिरंगा आमची शान

देशाचा असे अभिमान

आज तिरंग्यात पावन झालो मी

वीरांना जपला स्वाभिमान..


तिरंग्याच्या रक्षणासाठी

दिले प्राणाचे बलिदान

न झुकता कुणापुढेही

राखली तिरंग्याची शान..


देशप्रेमासाठी दिली आहुती

नसे कोणतीच चिंता ना भय

आज तिरंग्यात पावन झालो मी

अभिमानाने म्हणती भारत माता की जय..


तिरंग्यात पावन झालो मी

तीन रंग असती प्रतिक शौर्याचे

देश रक्षणासाठी वीरांनी

बलिदान दिले प्राणांचे..


आज आठवा वीरांना

ज्यांनी दिली आहुती प्राणांची

देश रक्षणासाठी वीरांनी

शान राखली तिरंग्याची..


देशभक्ती आज

रोमारोमात बसावी

साक्ष ठेवून इतिहासाची

आठवण मनात जपावी..


साहित्याला गुण द्या
लॉग इन