STORYMIRROR

Sarika Sarkale

Others

3  

Sarika Sarkale

Others

चुकलेचं माझे

चुकलेचं माझे

1 min
346

कोरोना काळात एक

खंत मनात राहिली

थोडं चुकलंच माझे 

घरच्यांची भेट नाही घेतली...१


सासरी आहे मी मोठी

अजून पाहिले नाही

कसे आहेत सगळे

हे पण माहित नाही...२


दीरांच्या लहान मुलांना

नाही पाहिले अजून

वाटतं कधी योग येईल

हीच खंत वाटते मनातून....३


झाली बाळे मोठी

जवळजवळ एक वर्ष झाले

तरी गेले नाही मी त्यांचे

पहिले वाढदिवस आले...४


फारच वाईट गेला

सगळा कोरोनाचा काळ

फोन केला की हाक

मारतो काकू अशी बाळ....५


चुकलंच जरा माझं

आता भेटून येईल

पाहून त्यांना मला

खूप आनंद होईल...६


साहित्याला गुण द्या
लॉग इन