सुख समृद्धीचा मळा बहरला
सुख समृद्धीचा मळा बहरला
1 min
335
आज उधाण आले आनंदाला
सुख समृद्धिचा मळा बहरला
पाहून हिरवळ चहुकडे
मनाला फार आनंद झाला....१
करता अपार परिश्रम
झाले कष्टाचे चीज सारे
अखंड शिवारातून वाहे
सदा सुख समृद्धीचे वारे....२
पाहून पीक डौलदार नवे
पारणे फिटले डोळ्यांचे
आठवती आज क्षण सारे
इथून पाट वाहिले मळयांचे....३
सर झाले शिखर यशाचे
सार्थ झाले जीवनाचे
मिळता विजयश्री जीवना
दिवस आठवती कष्टाचे....४
जीवपेक्षा जास्त जपला मळा
नाही पुरवले चोचले कधी
आज घरा आले सुख समाधान
त्यासाठी रक्त आठवले आधी....५
