काव्य धारा बरसली
काव्य धारा बरसली
1 min
394
काव्य रूपी अंगणात
काव्य धारा बरसली
शब्द सुमनांची तेथे
जणू बागच बहरली....१
जेव्हा नभातून
काव्य धारा बरसली
तेथे कवी कवयित्रींची
मैफिल रंगली....२
नवनवीन कवितांची
काव्य धारा बरसली
जणू तेथे सारी
पुष्पांजली अवतरली....३
कवितांचे काव्यांगण
भरभरून गेले
काव्य धारा बरसताच
मैफिलीला रंग आले...४
परिक्षक आयोजकांनी
केले अचूक नियोजन
काव्य धारा घेण्यामागे
कौशल्य होते प्रयोजन....५
