करू या प्रार्थना
करू या प्रार्थना
का मी तल्लीन झाले
आयते उच्चारण्यास
अल्लाहच्या स्मरणाने
रोगराई नष्ट करण्यास
का मी तल्लीन झाले
वेद मंत्र जपण्यास
देवाच्या आशीर्वादाने
वेदना शमवण्यास
का मी तल्लीन झाले
बायबल वाचण्यास
जीजसच्या कृपेने
लोकास वाचवण्यास
का मी तल्लीन झाले
विश्व शांति मंत्र उद्गारण्यास
धर्म जरी वेगळे असले
भावना एकच मनात जपण्यास
होऊन आज तल्लीन सगळे
करू एकच प्रार्थना
धरती आहे सुंदर तुझी
वाचव तुझ्या लेकरांना
