करू का घर तुझ्या मनात
करू का घर तुझ्या मनात
मी करू का घर तुझ्या
मनात सखे
देशील का स्थान मला
जीवनात सखे || 0 ||
वाट बघतोय कधीपासून
तुझ्या हो बोलण्याची
माझ्यासमोर तुझं
मन खोलण्याची
ये माझ्या हृदयाच्या
प्रांगणात सखे
देशील का स्थान मला
जीवनात सखे || 1 ||