करू अखंडित सेवा साहित्याची
करू अखंडित सेवा साहित्याची
मनापासूनच आपण करू
अखंडित सेवा साहित्याची|
वेड असावे वाचन, लिखाणाचे
प्रचंड गोडी असता साहित्याची||१||
चारोळ्या, आठोळ्या, षडाक्षरी,
अष्टाक्षरी, दशपदी, अभंग लिहू|
लेख, निबंध, कथा, कादंबऱ्या,
नाटक, समिक्षा, ग्रंथ वाचून घेऊ||२||
साहित्यातील सर्वच क्षेत्राची
माहितीही करुन घेत ती राहू|
नवनवीन साहित्य प्रयोगाची
उजळणी करु नि लिहून पाहू||३||
साहित्य देते ज्ञान करी मनोरंजन
मनःस्थितीतही योग्य बदल घडवी|
साहित्यसेवा निखालसपणे करता
मिळे मान, सन्मान, पुरस्कार, पदवी||४||