STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

कर्तृत्ववान महिला

कर्तृत्ववान महिला

1 min
1.6K

होऊन गेल्या भारत देशी कर्तृत्ववान महिला

मनःपूर्वक मुजरा मानाचा महिलांना पहिला ।।धृ।।


शूर वीरांच्या गोष्टी सांगून शिवबाला घडविले

आई जिजाऊमुळे हिंदवी स्वराज्य स्थापन झाले

कमीच आहे चरणावरती प्राण जरी वाहिला ।।१।।


"मेरी झाशी नही दुंगी" म्हणत शूरपणे लढली

बांधून पाठी बाळ मर्दानी घोड्यावरती चढली

इंग्रजांना माघारीचा मार्ग लक्ष्मी बाईने दाविला ।।२।।


गानकोकिळा लता दीदींनी नांव उज्ज्वल केले

अशिक्षित बहिणाबाईंनी ज्ञान काव्यातून दिले

झेप नभी घेती सुनीता विल्यम, कल्पना चावला ।।३।।


एक सावित्री पतीच्या प्राणास्तव यमाशी भांडली

दुसरीने स्त्री शिक्षणासाठी शाळा नवीन काढली

किती स्त्रियांनी आपापल्या क्षेत्री ठसा उमटविला ।।४।।


आजही महिला घर आणि व्यवहार सांभाळते

अर्थार्जनास्तव पुरुषाच्या खांद्यास खांदा लावते

म्हणून तिजला जगात आहे आज मान पहिला ।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational