STORYMIRROR

Gaurav Daware

Drama

3  

Gaurav Daware

Drama

कर्तबगार राजा

कर्तबगार राजा

1 min
265

आज मी सांगतो तुम्हांला एका राजाची कहाणी

राजा एक असा ज्याची कर्तबगार होती वाणी

तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द ते ठेवायचा ज्ञानी

कितीही मोठी अडचण तरी त्यांची दक्ष होती जुबानी


राजा होता साधा पण त्याचे शब्द अफलातूनी

प्रत्येकाला द्यायचा न्याय आपल्या मंत्र्यांच्या वाणी

थोडा अरकट दंडही तो सुनवायचा रात्र जागुणी

खरच असा राजा म्हणजे जनतेची पुण्य वाणी


कधी कधी जिंकायचा ते शत्रूला युद्धातुनी

प्रत्येक सैनिकांची किम्मत ते ठेवायचे नेहमी राखुनी 

नुकसान झालेल्या सैनिकांची ते मदत करायचे हातूनी

शत्रूही फार आनंदी असायचा राज्याच्या चाहूबाजूनी


नौकरांना देऊन शिक्षण ते बनवायचे त्याला ज्ञानी

नौकर आजारी पडताच त्याचे करायचे औषधपाणी

खरच अश्या राजाच काम मोठं होत ईश्वराहुनी

स्वतःपेक्षा जनतेची काळजी असायची त्यांच्या वाणी


राजाही आजारी पडताच प्रजा देवाला ठेवायची ज्ञानी 

देवासमोर करायचे प्रार्थना डोळ्यात घालुनी वंगण न पाणी

असं राजा प्रजेच प्रेम असायच कित्येकाच्या जुबानी

खरंच असा राजा म्हणजे प्रजेची प्रेमळ पुण्य वाणी. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama