STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Romance Classics

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Romance Classics

कृष्णसखी

कृष्णसखी

1 min
188

सावळ्या कृष्णास

भाळली हि वेडी राधा

सांग तिला सोडून

कृष्ण होईल का सीदा - साधा?


मन धुंद करणार्या मुरलीने

मंत्रमुग्ध हा करीतो

सप्तसुरांंच्या जोरावर

वृंदावन हा थिरकावतो


नक्षत्राच्या चांदण्यात

तुझ चांदण तुला दिसे का

ओढ तुझ्या अंतरीची

हि न सांगता त्याला कळेल का?


अखेरच्या श्वासापर्यंत 

तु जपत राहशील त्याच नाव

हजारो गोपिकांनी घेेरलेला

सांग कशी घेईल धाव?


अव्यक्त प्रेमाला किंमत नसते

हे कळेल कधी तुला?

प्रेम मिळत नाही मिळवावे लागते

हे कधी उमजेल तुला?


कोण राधा? कोण मीरा?

काय त्याचा फरक पडतो?

साथ सोबतीची लाभावी

अशी कृष्णसखी कान्हा शोधतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract