कर्जदार....!
कर्जदार....!
कर्जदार ...!
मला वाटते बाबांनो
कर्जाला घाबरू नये
चांडाळांच्या दुनियेत या
खाली मान घालू नये
बँक असो की सावकार
दोघेही पिंडाचेच कावळे
आम्ही आहोत बावळे
म्हणून यांचे फावले
इज्जती साठी जीव देतो
प्रामाणिक माणूस या जीवनी
चांडाळ खातो तूप रोटी
भ्रष्ट झाली सारी अवनी
आता उगवतील मनातून
कष्टाचे पुन्हा भाले
म्हणतील पुन्हा जोमाने
पैसा मांगने आवो साले
कुत्रे भुंकता दाराशी
भाकर तुकडा फेकला राहून उपाशी
चटक लागता कुत्र्याला नीत्य येते मग ते
भाकर तुकडा खाण्या आपल्या घराशी
घेऊन स्वाभिमानाची काठी
बसूया ठाण मांडून आपल्या दाराशी
परत पुन्हा येता काठी मारू माथ्याशी
समाधान मिळण्या दुःखी उराशी
भिकाऱ्यांची औलाद ही
शेण खाऊनच मरणार
पण आता त्यांना यापुढे
एक छदामही नाही मिळणार
नादच सोडला आता आम्ही
पुन्हा कर्जदार होण्याचा
जगू मीठ भाकर खाऊन
संकल्प केलाय आता घामाचा ...!
