STORYMIRROR

sarika k Aiwale

Inspirational

3  

sarika k Aiwale

Inspirational

क्रांतिज्योती सावित्री बाई फुले

क्रांतिज्योती सावित्री बाई फुले

1 min
189

आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही सरस्वतीच्या पुजारी

सक्षारतेचा मंत्र शिकवुनी

स्वतंत्रतेचा मार्ग देऊनी

पहिली तु कर लक्ष्मी

नसे अशक्य काहीच

दाविले करुन कल्युगी

लेखणीची तलवार दिली हाती


कर्म भुमी तुझी खरी माय

स्वतंत्र विचाराची तु शिल्पकार

घडविले असे भविष्य स्त्री यांचे

तु असे माय जाती वंत कुंभार

परंपरा आणी रुढी वादी समाज ची

लाथडली असे तु मक्तेदारी

शिकवले दिन दुबळ्यालाही


अनाथ,पारितक्त्यंची आधारी

पुरषप्रधान संस्कृतीत एक आव्हान

जगली खरी तु तलवार ज्वाला

लढली या भ्रम वादी समजशी

जागवला त्यांच्यात स्त्रीशक्तीला

घरतील स्त्री शिकली

नवी पिढी सुसंकृत झाली

बरसाटलेलया विचारा तुनी

माये नी मुक्तताकरुन दिली


शतदा होते ऋणी मनी

तरी एक प्रश्न विचारते मन

आज असती ती जिवंत 

काय गर्व झाला असता का तिला ?

का प्रेरित केले असते तिने मला ?

मायेच्या हळव्या धाग्यात गुन्फुनी

विरळ कसे झाले ती शिकवण

का बिथरली नवी पिढी आजुनी


पुन्हा पेटवुनी मशाल

तिनेच जागवली असती

मेलेल्या मनात ही अशा

स्त्री ची ती खरी आस्था

नसती भावली तिला ही

शिक्षित स्त्रियांचे शोषण


नसत पटल तिला ही

अत्याचारचे हे भयाण चित्र

आम्ही सावित्रीच्या लेकी

तिच्यासम होऊ खणखर

शिक्षणाची कास धरुनी

देवू अज्ञानस्वरुप काळस क्षय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational