क्रांतिज्योत महात्मा जोतिराव फ
क्रांतिज्योत महात्मा जोतिराव फ
तुम्हीच केलीत समाज सुधारणा राहुन कार्यरत अहोरात्र!
झेलून समाजकंटकांचे शिव्याशाप झिजविले गात्र!!१
अस्पृश्यता निवारणाचा धरुनी मनी एकच नित्य ध्यास!
त्यास्तव वेद स्मृती पुराणांचा करूनी स्वत:च खूप अभ्यास!!२
अस्पृश्यता जातीय वादांचा करूनी धिक्कार!
सार्वजनिक सत्यधर्म शिकवून केला अंगिकार!!३
समता-बंधुभाव हेच निर्मिकाचे पटवून देत खरे तत्व!
समाज बांधवांत या आणले एकात्मता बंधुत्व!!४
काढून पहिलीच शाळा पुण्यात स्री शिक्षणाची उभारुनी गुढी!
बंड पुकारुन विद्येनेच नष्ट करावयास धजले अनिष्ट रुढी!!५
पत्नी सावित्रीबाईंना शिकवून तुम्ही दिला खरा सन्मान!
तुमच्याच शिक्षणकार्यात तिने दिले अनमोल योगदान!!६
नावाप्रमाणेच ज्योत-समईचीच उपमा उभयतांना शोभूनी दिसते !
उत्तुंग शिखर यशाचे तितुके सावित्री-ज्योतिबांनी गाठले होते!!७
स्रियांचे उद्घारकर्ते बनुनी धरतीवर तुम्ही अवतरले!
अन्याय्य प्रथांनी स्रीलाच होते तितुके जखडले!!८
आजही हवे होते आम्हांला तुमच्या समान समाजसुधारक!
करुनी अत्याचार मुक्त स्रियांना ठरतील जे दु:ख निवारक!!९
सत्यशोधका तुम्हाला करीते प्रणाम तुमच्या स्मृतीदिनी!
तुमच्या मुळेच धरु शकले मी आज हाती ही लेखनी!!१०
