STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले

क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले

1 min
355

ना कुणाची पर्वा 

ना कोणाची भीती 

अज्ञानाच्या अंधारात नावाप्रमाणे पेटवली ज्यांनी ज्योती  


किती ते कष्ट म्हणावे 

किती त्या वेदना

 ज्या वेळेस स्त्री हक्काचा गंधही नव्हता तेव्हा शिक्षण दिले जोतीबांनी विधवांना 

 बुधवार पेठेत काढली 

मुलींची शाळा  

सावित्रीला शिक्षिकेचा मान मिळाला पहिला


"आसूड" ग्रंथ लिहून शेतकरी यांसाठी ही केले मोठे कार्य 

अनाथांसाठी बांधले बालहत्या प्रतिबंधक गृह 


समाज कसा करतो आपली चिरीमिरी त्यासाठी ज्योतीबांनी पुस्तक काढले गुलामगिरी  


समाज कसा असावा साज 

म्हणून स्थापिला सत्यशोधक समाज 


बोलणारे मिळतात अनंत सुधारक 

परंतु ज्योतिबा कृतीकारक 

अनंत काळात असा जन्मतो पुण्यात्मा

 जगात यांनाच म्हणतात महात्मा 🙏🙏


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational