STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

4  

Sanjana Kamat

Inspirational

क्रांतीज्योती सावित्रीबाई

क्रांतीज्योती सावित्रीबाई

1 min
256

तेवे स्त्री शिक्षणाची सुवर्ण क्रांतीज्योत,

प्रथा,रूढी तोडे सावित्रीबाई फुले थोर.

गगनभेदी पहाट आणली त्यांनी भूवरी,

घाण,मल,शेण मारा खात संघर्ष घोर.


क्रांती विधवा पुनर्विवाह चळवळ,

थांबवत सती प्रथा,स्त्री भ्रूणहत्या.

मुल विधवेचे दत्तक केले डॉक्टर,

काशीबाई विधवेची रोखे आत्महत्या.


रोखे बालहत्या, अनाथाश्रम स्थापत,

दलितांच्या उध्दारा केले मोठे योगदान.

मार्ग खुले शिक्षणाकडून प्रकाशाचा,

मिळवीत समाज सुधारणेचा बहुमान.


लेक शिकता झाली देशाची प्रगती,

दिसे कल्पना, इंदिराची गरुडझेप.

संकल्प,दृढनिश्चय कतृत्व झळकत,

कलयुगी आत्मविश्वासाने घेत झेप.


क्रांतीज्योती सावित्री फुले ती महान,

दिला स्त्रीला शिक्षण अमृतकुंभ छान.

करू म. जोतिबा- सावित्रीबाई प्रणाम,

जनहिता समानहक्काचे ते ज्ञानाजंन.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational