करा साक्षर
करा साक्षर


करा हो साक्षर
एक तरी जीव
देणगी अमोल ही
आजन्म अक्षर
सोने रुपे सारे
फिके यापुढे
वसने वासणे
झिजूनि जाती
खुलती दालने
शिकता अक्षरे
अमोल खजिना
नजर ठरेना
घ्या हो शिकूनी
अक्षरे जरासी
व्यवहारी हेचि
नाणे खणखणीत
ना बंधन वयाचे
न जातपात अडे
नाही अक्षरांना
कशाचे वावडे
शिकवा शिका
अक्षरे अक्षरे
ज्योतीने ही ज्योत
पेटवावी