STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

कोविडासूर

कोविडासूर

1 min
243

आला कोविड आसूर

घाव घाली घणाघाती

वैद्य उभे दिनराती

देती सोडूनी विश्रांती


केले त्याने गिळंकृत

क्रूरपणे मानवासी

पैसे चिमुकली देई

किती करु कौतुकासी!!


लोक खायला महाग

गृहिणीही होई पुढे

डबे करुनी लोकांना 

देई रोज आनंदाने


नसे पर्वा घड्याळाची

जाण मनी कर्तव्याची

साथ परिचारिकेची

सेवाधर्म जाण तिची


मानवता हाच धर्म

पोलिसांना उमगला

अन्नदान करुनिया

धर्म त्यांनी जागविला


लाभे पाठिंबा देवाचा

आला धरतीवरती

श्रद्धा भक्तीची प्रचिती

तेथे कर माझे जुळती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract