कोतळूक माझं गाव
कोतळूक माझं गाव


कोतळूक छोटंसं आहे माझं गाव
इथे नांदतो रंक आणि राव
आई झोलाईची आहे गावावर माया
धरते वाघजाई सुखाची छाया
माझ्या हायस्कुलला लाभलंय भारी
गोपाळ कृष्ण गोखले यांचं नाव
त्यांची किर्ती अगाध ती होती
आज भासे इथल्या मातीला अभाव
कोतळूक गावात आहे छोट्या छोट्या वस्ती
टिकवून ठेवलीय आम्ही नातीगोती दोस्ती
कसली ना आहे आम्हां इथे चिंता
आहे प्रेमळ भोळी इथली जनता
गावात होतात जेव्हा क्रिकेट सामने
तेव्हा तुडुंब भरून जातात मैदाने
साऱ्या खेळाडूंचा जल्लोष असतो भारी
खेळतात खेळीमिळीने जपूनी यारी
गावातून वाहते इवलीशी आमची नदी
जातात पोर तिच्यात पोहायला अधीमधी
गाव म्हटलं की खरंच लहानपण आठवतं
त्या प्रत्येक क्षणांना डोळ्यांमध्ये साठवतं...